अमळनेर | अटकाव न्यूज :अमळनेर तालुक्यातील मारवड येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी आनंदवार्ता समोर आली आहे. मारवड येथील शाळेचे कर्तव्यदक्ष, निष्ठावान व विद्यार्थ्यप्रिय शिक्षक श्री. एन. वाय. साळुंखे सर आणि श्री. योगेश विजय पांने सर यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.टीईटी परीक्षा ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक मानली जाते. शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर अध्यापन करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेतील यश हे शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेसह अध्यापन कौशल्य, विषयज्ञान व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे द्योतक मानले जाते. श्री. साळुंखे सर व श्री. पांने सर यांनी आपल्या कठोर परिश्रमातून हे यश प्राप्त करून आदर्श घालून दिला आहे.शाळेत अभिनंदनाचा सोहळाया यशाची माहिती मिळताच मारवड शाळेत